शरद पवार – प्रकाश आंबेडकर भेट

शरद पवार – प्रकाश आंबेडकर भेट

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी निवडक विषयांवर चर्चा केली. पण मोदी विरोधी आघाडीत वंचित सहभागी होण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.

प्रकाश आंबेडकर हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनाही भेटले. पण मोदी विरोधी आघाडीत वंचितच्या सहभागाबाबत चर्चा झाली नाही. वंचित भाजपासोबत जाणार नाही. पण मोदी विरोधी आघाडीत त्यांच्या सहभाग असणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण या मुद्यावर चर्चा झालीच नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version