नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी २०२३ च्या लोकसभेसाठी नव्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राहुल गांधी आधी उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. पण भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याकडून मोठे आव्हान मिळत
असल्याचे लक्षात येताच २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी अमेठी आणि केरळमधील वायनाड या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली. अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव झाला तर मुसलमानबहुल मतदारसंघ अशी ओळख सांगणाऱ्या वायनाडमधून राहुल गांधी निवडून आले. आता राहुल गांधी वायनाड ऐवजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. वायनाडमधून राहुल यांनी निवडणूक लढवू नये, अशी मागणी डाव्या पक्षांकडून सुरू झाली आहे. डाव्यांशी संघर्ष टाळण्यासाठी राहुल गांधी मतदारसंघ बदलण्याच्या तयारीत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.