‘अजित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न’

‘अजित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न’

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : अजित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजित पवार यांच्यावर खोटे आरोप होत आहेत. सकाळचा भोंगा अर्थात उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत अजित पवारांना बदनाम करत आहेत, असा आरोप प्रशांत पवार यांनी केला. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पवार यांनी अजित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या लक्षवेधी चर्चेत बोलत होते.

येरवाडामधील सरकारी भूखंड विकासाकरिता खासगी विकासकाला देण्याचा प्रयत्न सुरू होता. यासाठी दबाव टाकला जात होता. हे सगळे सुरू होते. त्यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होते. ते जमिनीच्या विषयावर बोलले होते, असे माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर म्हणाल्या. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. हे आरोप मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी फेटाळले. या पार्श्वभूमीवर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या लक्षवेधी या कार्यक्रमात चर्चा झाली. या चर्चेवेळी प्रशांत पवार यांनी अजित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version