छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यू डासांचं थैमान

छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यू डासांचं थैमान

संभाजी नगर, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: वातावरणातील बदलामुळे विविध आजारांने डोकं वर काढलं असताच त्याच छत्रपती संभाजीनगरयध्ये डेंग्यूचा कहर वाढत असून, गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात डेंग्यूच्या ५५ रुग्णांचे निदान झाले. तब्बल ६ हजार ८३६ घरांमध्ये डास अळ्या सापडल्या आहेत.


दरवर्षी पावसाळा व त्यानंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो. “एडिस इजिप्ती’ या डासापासून डेंग्यूचा प्रसार होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. घरातील कूलर, फुलदाणी, मनिप्लॅटमधील पाणी, हौद आदी ठिकाणी प्रामुख्याने उत्पत्ती होते. जिल्हा हिवताप कार्यालयाने महिनाभरात जिल्ह्यातील १ लाख ४० हजार घरांची तपासणी केली. तेव्हा यातील ६ हजार ८३६ घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version