शिंदे सरकारची राज ठाकरेंना चौदा आश्वासने

शिंदे सरकारची राज ठाकरेंना चौदा आश्वासने

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : टोल प्रकरणी अर्थात पथकर प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिंदे सरकार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेअंती राज्य शासनाने राज ठाकरे यांना चौदा आश्वासने दिली.

१. टोल नाक्यांवर वाहने मोजण्यासाठी कॅमेरे बसवणार
२. टोल वसुलीसाठी केलेल्या करारात नमूद सोयीसुविधा संबंधित रस्त्यावर मिळतात का, याची तपासणी करणार. ही तपासणी सरकार आणि मनसेचे प्रतिनिधी संयुक्तपणे करणार.
३. टोल प्रकरणी तक्रारी नोंदवण्यासाठी मंत्रालयात विशेष यंत्रणा, तक्रार नोंदवण्यासाठी लवकरच मोबाईल क्रमांक जाहीर केला जाणार
४. करारातील सर्व उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटीकडून करणार
५. ठाण्यातील टोलवाढ रद्द करण्याठीचा निर्णय एक महिन्याच्या आत घेतला जाणार
६. टोल नाक्यांवर यलो लाइनच्या बाहेर रांग गेल्यानंतर रांग कमी होईपर्यंत गाड्या टोल न घेता सोडल्या जाणार
७. टोलनाक्यावर फास्टटॅग चालला नाही, तर एकदाच पैसे भरावे लागणार. पुन्हा मोबाइलवर पैशांसाठी मेसेज आल्यास तक्रार नोंदवता येणार.
८. टोलसाठी किती रुपयांचे कंत्राट आहे, किती पैसे वसूल झाले आणि अजून किती पैसे जमा होणं बाकी आहे, याची माहिती देणारा बॅनर टोलनाक्यावर लावणार
९. आनंदनगर किंवा ऐरोली अशा एकाच ठिकाणी टोल भरावा लागणार
१०. मुलुंडच्या हरीओमनगरमधील रहिवाशांसाठी मुलुंड म्हाडा कॉलनीमधून पूल बांधला जाईल
११. केंद्राच्या अखत्यारितील रस्ते खराब असतील तर तो टोल बंद करण्याचा नियम आहे. याबाबतही पुढील १५ दिवसांत राज्य सरकार हे केंद्र सरकारशी बोलून कार्यवाही करेल.
१२. सार्वजनिक बांधकाम विभागाचे २९ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे १५ जुने टोल बंद करण्यासंदर्भात पुढील १५ दिवसांत मुख्यमंत्री निर्णय घेतील.
१३. मुंबई प्रवेश, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राजीव गांधी सीलिंक याचे कॅग ऑडिट करणार
१४. अवजड वाहनांच्या चालकांना मार्गिकेचे पालन करण्याची शिस्त लावणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version