अंमली पदार्थविरोधी मोहीम

अंमली पदार्थविरोधी मोहीम

वाशी, ७ ऑक्टबर २०२३, प्रतिनिधी : नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. ठिकठिकाणी धाडी टाकून अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित असलेल्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पंधरा नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी पकडले आहे. पकडलेल्या पंधरा नायजेरियन नागरिकांपैकी चौदा नायजेरियन नागरिकांचा व्हिसा संपला असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. व्हिसा संपलेल्या नायजेरियन नागरिकांना देश सोडण्याचा आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाकडून ८४ लाख ८५ हजार रुपयांचे कोकेन आणि एमडी अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या नागरिकाविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कारवाई सुरू असताना एक नायजेरियन नागरिक पळून गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version