फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चर्चेला उधाण

फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चर्चेला उधाण

मुंबई, ५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच मुख्यमंत्री राहणार आणि त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अजित पवार मुख्यमंत्री होतील पण इतक्यात नाही. त्यांना मुख्यमंत्री केले तर पाच वर्षांसाठीच करू. पण ते योग्य वेळी करू; असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. एका मुलाखतीमधील प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

केला नवा गौप्यस्फोट

मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. ‘पवारांनीच भाजपला समर्थन देण्याची तयारी दाखवली. पण विरोधात निवडणूक लढवून अचानक निर्णय बदलणे गैरसोयीचे ठरेल, म्हणून आधी राज्याचा दौरा करायचा विचार पवार करत होते. दौऱ्यानंतर राज्यात स्थैर्य राहावे यासाठी भाजपला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करतो, असे पवारांनी सांगितले,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

निर्णय बदलण्यासाठी वेळ मिळावा म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी असा विचार पवारांकडून आला. राष्ट्रपती राजवट लागू करण्याआधी सरकार स्थापन करू शकता का, असे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या पक्षाला विचारले जाते. राष्ट्रवादीला ही विचारणा करण्यात आली होती. पण राष्ट्रवादीने तेव्हा अधिकृतरित्या सरकार स्थापन करू शकत नाही, असे पत्र राज्यपालांना दिले होते. हे पत्र माझ्याच घरी तयार झाले. पवारांनी सुचवलेले बदल या पत्रात करण्यात आले. यानंतर पत्रावर पवारांनी सही केली,’ असेही फडणवीस म्हणाले. पवारांमुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असे फडणवीसांनी सांगितले.

फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री अशा स्वरुपात भाजप – राष्ट्रवादीचे युती सरकार स्थापन करावे हा विचार शरद पवार करत होते. पवारांनी चर्चा केली, सरकार स्थापनेचे सूत्र ठरले. आमच्याकडे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी होती. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठीची तयारी झाली आणि अचानक पवारांनी निर्णय फिरवला. पण अजित पवारांना ते पटले नाही त्यामुळे त्यांनी ठरल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला; असे फडणवीस म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version