पनवेल – बेलापूर दरम्यान वाहतूक संथगतीने

पनवेल – बेलापूर दरम्यान वाहतूक संथगतीने

पनवेल, ३ ऑक्टोबर प्रतिनिधी : पनवेल – बेलापूर दरम्यान रेल्वे वाहतूक संथगतीने सुरू आहे. गाड्या ४० ते ५० मिनिटे उशिराने धावत आहेत. काही गाड्या आयत्यावेळी रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

मालगाड्यांसाठी स्वतंत्र लोहमार्ग तयार करण्यासाठी पनवेल – बेलापूर दरम्यान महिन्याभरापासून काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाचे काम सुरू असल्यामुळे दररोज रात्री उशिरा पनवेल पर्यंत जाणाऱ्या गाड्या बेलापूरपर्यंतच जात होत्या. या बदलामुळे बेलापूर – पनवेल पट्ट्यात राहणाऱ्या आणि रात्री उशिरा जाणाऱ्यांची गैरसोय होत होती. काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान मेगाब्लॉक घेतला. हा मेगाब्लॉक ३८ तासांसाठी असेल असे जाहीर करण्यात आले. पण सोमवारी २ ऑक्टोबरला मेगाब्लॉक आणखी काही तास वाढवण्यात आला. आधी ३८ तासांचा असलेला मेगाब्लॉक वाढीव कालावधीमुळे ४१ तासांचा झाला. ब्लॉक काळातील काम संपले तरी आणखी एक आठवडा दररोज रात्री साडेबारा ते सकाळी सकाळी ६ दरम्यान ब्लॉक असेल. यामुळे प्रवाशांना आणखी काही काळ त्रास सहन करावा लागणार आहे.

ट्रॅक चेंज पॉइंट

मेगाब्लॉकमध्ये रेल्वेने अनेक तांत्रिक कामं पूर्ण केली. पण मंगळवारी ट्रॅक चेंज पॉइंटमध्ये बिघाड झाला. या बिघाडामुळे हार्बर मार्गावर पनवेल येथून सुटणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत होत्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version