कांदा व्यापाऱ्यांची सोमवारी पुन्हा महत्त्वाची बैठक

कांदा व्यापाऱ्यांची सोमवारी पुन्हा महत्त्वाची बैठक

नाशिक, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सोमवार २ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू केले. पण राज्यातील मोठ्या बाजारपेठांतील कांदा लिलावाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कांदा व्यापारी संध्याकाळी पुन्हा एक बैठक घेणार आहेत. नाफेड कांदा खरेदी करत आहे तसेच काही ठिकाणी कांदा विक्री पण करत आहे. या उलट व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करणे थांबवले होते. पण लिलावाच्या मुद्यावरून व्यापाऱ्यांमध्येच फूट पडली. काही बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू केला आहे. तर उर्वरित बाजार समित्यांमध्ये लिलाव अद्याप सुरू झालेले नाही. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version