‘भाजपाने पाठीत खंजीर खुपसला’

‘भाजपाने पाठीत खंजीर खुपसला’

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरूच आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरूच असतात. त्यातच आता भास्कर जाधव यांनी भाजपावर घणाघात केला आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव ?
सत्तेत समान वाटा देऊ असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या समोर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. मात्र फडणवीस खोटं बोलत असल्याचा भास्कर जाधव यांचा आरोप. अजित पवार यांना सरकार मध्ये घेतल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री केलात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुम्ही रात्रीच्या वेळी गुपचूप भेटत होतात हे स्वतःच अनेकदा सांगता. याचा अर्थ तुमच्यातल्या चर्चा बंद दाराच्या आड झाल्या हे सिद्ध होतं. आणि उद्धव ठाकरे म्हणत होते तेच खरं होतं. अमित शाहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकी बद्दल उद्धव ठाकरे सातत्याने शपथ घेऊन सांगत होते.
असा घणाघात भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

तसेच, सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने कधी कुठल्या आमदाराच्या निधीवर स्टे आणला नव्हता. मात्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्या आमदारांच्या निधीवर स्टे आणला. यासाठी मी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सगळ्यांना भेटलो. पण कुणीही ऐकलं नाही. शेवटी मला कोर्टात जावे लागले. न्यायालयाने सरकारला सुनावले. भास्कर जाधव यांच्या निधीवरचा स्टे तुम्ही उठवणार आहात की आम्ही उठवू ? असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारला करत निधी वरील स्टे वरून खडेबोल सुनावले. असेही, ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version