मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई महापालिकेत कोविड हॉस्पिटल घोटाळा झाला आहे. संजय राऊत यांच्यामुळे सुजित पाटकरवर मेहेरनजर करण्यात आली आहे. सुजीतला कंत्राट मिळताच मोबदला म्हणून नेत्यांना सोन्याची बिस्कीटे, नाणी देण्यात आली; असा आरोप ईडीने आरोपपत्रात केला आहे. ही माहिती भाजपाचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी दिली. दहिसर आणि वरळी कोविड सेंटरचे ३२. ६० कोटींचे कंत्राट सुजीतला देण्यात आले. या बदल्यात सोन्याच्या नाण्यांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीच्या आरोपपत्रात असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.