मुंबई, २७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मंत्रालय प्रवेशासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत मंत्रालयात आंदोलनकर्त्यांनी प्रवेश करून आत्महत्येचा प्रयत्न करणे, घोषणाबाजी करणे असे प्रकार घडले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मंत्रालय प्रवेशाची नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.