डोंबिवलीत दारुड्याकडून मतिमंद मुलीची हत्या

डोंबिवलीत दारुड्याकडून मतिमंद मुलीची हत्या

डोंबिवली, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : डोंबिवली जवळ असलेल्या मानपाडा गावात रविवारी संध्याकाळी एका दारुड्याने राहत्या घरातच स्वतःच्या १० वर्षांच्या मतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केली. रविवारी संध्याकाळी मनोज नेहमीप्रमाणे यथेच्छ दारू ढोसून घरी आला. त्याने दारुच्या नशेत मतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केली. नंतर तो फरार झाला. थोड्या वेळाने मनोजची पत्नी लिलावती घरी परतली, त्यावेळी मुलीला मृतावस्थेत बघून ती हादरली.

मनोज अनेकदा मतिमंद मुलीचा काहीच उपयोग नाही, तिला मरावेच लागेल अशी बडबड करायचा. यामुळे मनोजच्या पत्नीला सर्वात आधी पतीचा संशय आला. तिने मानपाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि संशयाबाबत सांगितले. मिळालेल्या माहितीआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. मनोज अग्रहरी (३५) याच्या विरुध्द पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. मुलीच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोजचा शोध सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version