पिशवीत मिळाले पाच दिवसांची नवजात

पिशवीत मिळाले पाच दिवसांची नवजात

घणसोली सेक्टर ३ येथे लक्ष्मी रुग्णालयाजवळ वन लाइट फिटनेसच्या बाजूला एक युवक अनोळखी बॅग ठेऊन निघून गेला होता. या बॅगेतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज नागरिकांना येऊ लागल्याने बॅग बघितली असता, बॅगेत एक पाच दिवसांची मुलगी मिळून आली. यावेळी तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी लहान चिमुकलीला रुग्णालयात दाखल करुन प्राथमिक उपचारानंतर नेरूळ मधील विश्व बालक केंद्रामध्ये पाठवले. याप्रकरणी अज्ञात इसमा विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version