वाशीत सीआयएसएफ जवानाला अटक

वाशीत सीआयएसएफ जवानाला अटक

वाशी, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : शाळेत शिकत असलेल्या मुलींचा पाठलाग करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी वाशीत सीआयएसएफच्या जवानाला अटक करण्यात आली आहे. वाशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुरजकुमार जगतराम (२५) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

एका पीडित विद्यार्थिनीने आपल्या आई वडिलांसोबत बाजारातून जात असताना आरोपीला ओळखले. ही माहिती विद्यार्थिनीने वडिलांना दिली. मुलीच्या वडिलांनी स्थानिकांच्या मदतीने आरोपीला पकडून वाशी पोलिसांच्या ताब्यात दिले. वाशी पोलिसांनी अधिक तपास केला असता सुरेशकुमारने पंधरा दिवसात अनेक शाळकरी विद्यार्थीनींची छेड काढली असल्याचे लक्षात आले. यानंतर वाशी पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंग तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version