रवींद्र वायकर यांचे बेकायदेशीर पंचतारांकीत हॉटेल पाडणार, सोमय्यांनी दिली माहिती

रवींद्र वायकर यांचे बेकायदेशीर पंचतारांकीत हॉटेल पाडणार, सोमय्यांनी दिली माहिती

मुंबई, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचे बेकायदेशीर पंचतारांकीत हॉटेल लवकरच पाडले जाईल, असे भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या हद्दीत रवींद्र वायकर यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. ज्या बांधकामासाठी परवानगीच नव्हती असे बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. वायकर यांचे फाईव्ह स्टार क्लब हॉटेल बेकायदेशीर आहे. याच कारणामुळे हे हॉटेल महापालिका प्रशासन पाडणार आहे, असे भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी सांगितले.

हॉटेलला संरक्षण मिळावे यासाठी वायकर यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका केली होती. पण उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. आता वायकर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाणे हा शेवटचा पर्याय आहे. सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि तिथेही विरोधात निकाल गेला तर हॉटेल पाडले जाईल. तसेच उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयात जायचे नाही असा निर्णय घेतला तरी हॉटेल पाडले जाईल, असे सोमय्या म्हणाले. न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे, न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने वायकरांची याचिका फेटाळल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

वायकर यांनी बेकायदेशीर पंचतारांकीत हॉटेल बांधले आहे. मुंबई महापालिकेने करमणुकीचे मैदान म्हणून जी जागा निश्चित केली होती त्या ठिकाणी वायकर यांनी बेकायदेशीर हॉटेल बांधले. या हॉटेलला परवानगी होती असा दावा वायकर करत होते. पण ही परवानगीच बेकायदा होती. ज्या बांधकामासाठी परवानगीच नव्हती असे बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. याच कारणामुळे उच्च न्यायालयाने वायकर यांची याचिका फेटाळली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version