सत्तेचा गैरवापर केला, पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

सत्तेचा गैरवापर केला, पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

जालना, २ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. चर्चा सुरू होती. पण कुठून तरी सूचना आल्या आणि पोलिसांनी बळाचा अमानुषपणे वापर केला. सत्ताधाऱ्यांनी शब्द पाळला नाही. सत्तेचा गैरवापर करून लाठीमार करण्यात आला, असा गंभीर आरोप खासदार शरद पवार यांनी केला. आंदोलकांना शांत राहण्याचे आणि शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे, असेही शरद पवार म्हणाले.

जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला. या कारवाईत जखमी झालेल्यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी सरकारवर गंभीर आरोप केला. चर्चा सुरू असताना अचनाक लाठीमार करणार आला. मुले, वडीलधारे सर्वांना लाठ्या मारण्यात आल्या. हवेत गोळीबार करण्यासाठी लहान छऱ्यांचा वापर करण्यात आला, असेही पवार म्हणाले.

गोवारी हत्याकांडावर पवारांचे स्पष्टीकरण

गोवारी हत्याकांडावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा का दिला नाही, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. यावर शरद पवार यांनी जालन्यात बोलताना स्पष्टीकरण दिले. मी मुख्यमंत्री असताना १९९४ मध्ये गोवारींचे प्रकरण झाले. तेव्हा मी मुंबईत होतो नागपूरमध्ये नाही, असे पवारांनी सांगितले. आदिवासी कल्याण मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता आणि नैतिक जबाबदारी घेतली होती, असेही पवार म्हणाले. मुंबईतील घटनेनंतर तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता, असेही पवार म्हणाले.

ओबीसींतून मराठ्यांना आरक्षण देणे शक्य

ओबीसींतून मराठ्यांना आरक्षण देणे शक्य आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात संस्थानांच्या काळात मराठ्यांना आरक्षण होते; असे शरद पवार म्हणाले. त्यांनी पुन्हा एकदा ओबीसींतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या पर्यायाचा विचार करण्याची मागणी केली.

महत्त्वाचे मुद्दे :

जालना जिल्ह्यात घडलेला प्रकार अतिशय गंभीर
सत्तेचा गैरवापर केला
पोलिसांनी बळाचा वापर केला
न्यायालयीन चौकशी करावी
चर्चेतून मार्ग निघाला असता
व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना बळाचा वापर करण्याच्या सूचना कुठून आल्या ?
छऱ्याच्या गोळ्या झाडल्या, ही गंभीर बाब
आंदोलकांनी आंदोलन शांततेत सुरू ठेवावे
कायदा हाती घेऊ नये
मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून मार्ग काढावा
देश पातळीवर जातनिहाय गणना व्हावी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version