‘महाराष्ट्रात शून्य जागा काँग्रेसला’

‘महाराष्ट्रात शून्य जागा काँग्रेसला’

मुंबई,१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी :  लोकसभेसाठी महायुतीचं मिशन ४८ सुरू झालंय. महायुतीच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. आमदार, खासदार आणि पदाधिकारीही बैठकीला उपस्थित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात ही बैठक होत आहे. यावेळी बोलताना सुनील तटकरी यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास उशीर झाल्याचं म्हटलं.

एका बाजूला देशातील विरोधी पक्षाच्या नेत्याची मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, हे विशेष आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे या बैठकीत मार्गदर्शक करणार आहेत.

या बैठकी दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्याच्यां बैठकीवर निशाणा साधला आहे, येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये शून्य जागा मिळतील असे वक्तव्य केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version