जवानच्या ट्रेलरवर चाहते फिदा….

जवानच्या ट्रेलरवर चाहते फिदा….

मुंबई, ०१ सप्टेंबर २०२३ प्रतिनिधी: बॉलिवूडचा किंग खान हा नेहमीच चर्चेत असतो. सध्या अभिनेता शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात शाहरुख हा विविध अवतारात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

जवानच्या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनमध्ये उत्सहाची लाट पसरली आहे. अनेकांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

जवान चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही सेकेंदाचा अॅक्शन सीन हा सगळ्यात लक्षवेधी आहे. जवान चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरुखसोबतच अभिनेता विजय सेतूपती, दीपिका पादुकोण आणि नयनतारा यांची देखील झलक पाहायला मिळाली आहे. तर; धमाकेदार अश्या जवानच्या ट्रेलरनंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version