मुंबई – पुणे महामार्गावर पुन्हा दरड कोसळली

मुंबई – पुणे महामार्गावर पुन्हा दरड कोसळली

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी धोकादायक दरडी काढण्यासाठी हा रस्ता दोन तास बंद ठेवण्यात आला होता. मात्र, काल रात्री ९ च्या सुमारास कामशेत बोगद्या जवळ दरड कोसल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनेत सुदैवाने कोणती मोठी दुर्घटना घडली नाही. या मुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिमाण झाला होता.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सूर आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासूनमुंबईपुणे एक्स्प्रेस वे वर देखील दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे या मार्गावर धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू आहे. असे असतांना गुरुवारी रात्री पुन्हा एकदा मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर कामशेत बोगदाच्या तोंडावर दरड कोसळली. दरडीचे दगड व माती बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.

कामशेतचा बोगदा संपल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर ही दरड कोसळली आहे. खंडाळा घाटातील धोकादायक दगड काढण्याचे काम झाल्यानंतर दुपारच्या सुमारास मुंबईकडे जाणारा रस्ता सुरू करण्यात आला होता. सलग दोन दिवस येथील धोकादायक दरडी काढून त्या ठिकाणी जाळ्या बसवण्याचे काम सरू आहे. असे असतांना देखील दरड कोसळने या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही घटना घडल्यावर रात्रीमहामार्गावरील देवदूत यंत्रणा आणि आय आर बी चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी दरड बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे.

कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर आठ ते सव्वा आठच्या सुमारास दरड कोसळली आहे. मात्र एक लेन सुरू असून आयआरबी च्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही दरड हटवून वाहनांसाठी रस्ता सुरळीत करण्यात येईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version