बुलढाणा, १२ मे २०२३, प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारच्या निकालाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलासा दिला आहे. हे अभय मिळाल्यावर मुख्यमंत्री थेट संत चोखोबा चरणी लीन होणार आहेत. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदेंचा पहिला दौरा बुलढाणा जिल्ह्यात होत आहे, हे विशेष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुक्रवारी १२ तारखेला बुलढाणा जिल्ह्यात आगमन होत आहे.
शुक्रवारी दुपारी त्यांच्या हस्ते इसरूळ येथील संत सेवा ट्रस्टच्या संत शिरोमणी चोखोबाराय मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पणा दरम्यान मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यंत्रणांकडून संध्याकाळी दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री शिंदे मुंबई येथून विमानाने संभाजीनगरकडे जाणार असून ११.५० वाजता हेलिकॉप्टरने इसरूळ कडे रवाना होणार आहेत. दुपारी १:३० वाजता ते इसरूळ येथून हेलिकॉप्टरने संभाजीनगर तर दुपारी २ वाजता संभाजीनगर येथून विमानाने मुंबईकडे रवाना होतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.