मुख्यमंत्र्यांच्या कर्नाटक दौऱ्यावर पवारांची टीका

मुख्यमंत्र्यांच्या कर्नाटक दौऱ्यावर पवारांची टीका

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मारकास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कर्नाटक दौऱयावरून मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला.

सध्या कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. अगदी पतप्रधानापासून ते राहुल गांधीपर्यंत सर्वच नेत्यानी प्रचारात सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील प्रचारात सामील झाले होते. यावर बोलताना पवार म्हणाले की, ‘लोकांना सामोरी जाण्याची ताकद या सरकारमध्ये नाही, सत्तासंघर्षावर लवकरच निकाल येईल. भाजपाचा आदेश शिदना मान्य करावा लागेल, भाजपामध्ये आदेशाची पद्धत आहे. म्हणून एकनाथ शिंदे प्रचारासाठी कर्नाटकात जावे जागले. शिंदेना भाजपाचा आदेश मान्य करावा लागतो.’ असा टोला पवारांनी लगावला.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, आम्ही आणखी जोमाने काम करणार, आम्ही कर्नाटकात पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला शून्यापासून सुरुवात करायची आहे. आमचं काय होतय, हा आमचा प्रश्न आम्ही आमच्या पक्षाचा विस्तार करु, वाढवू असं पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version