मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. बस नदीत कोसळल्याने अपघातात १५ जणांचा दुर्देवी मृत्यू आणि झाला असून २५ प्रवासी जखमी आहेत. सद्यस्थितीत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील डोंगरगाव येथे पहाटे ५:३० वाजता हा अपघात झाला असून हे संपूर्ण बस प्रवाशांनी भरलेली होती. ही बस पन्नास फूट उंचावरुन बस कोसळली आहे. बस पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळली. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरुच आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून अपघाताची कोणतीही माहिती अधिकृतरित्या प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
मध्यप्रदेश सरकारतर्फे अपघातातील मृताच्या नातेवाईकांनी ४ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तर गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना 50 हजार रुपयांची मदत केली जाहीर झाली आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांन २५ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.