‘कर्नाटकची इतकी बदनामी कुणीही केली नाही’

‘कर्नाटकची इतकी बदनामी कुणीही केली नाही’

कर्नाटकात ४० टक्क्यांचं सरकार आहे असं म्हटलं जातं, ही ४० टक्के भानगड काय असते हे काही कळेना अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर केली आहे. मणिपूरसारखं लहान राज्य भाजप सरकारला सांभाळता येईना असंही पवार म्हणाले. बेळगाव जिल्ह्यातल्या निपाणी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी भाजपवर टीका केली.

सभेत बोलताना शरद पवार म्हणाले,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की कर्नाटकात जाऊन शेतकऱ्यांचे, तरुणांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीत उतरायचं. त्यानंतर आम्ही या ठिकाणी उमेदवार दिले. उत्तम पाटील यांना निपाणीमधून संधी दिली. धनाचा वापर करून माणसं फोडून सरकार बनवली जातात, त्याला कर्नाटक देखील अपवाद नाही. अशा पैशाचा वापर करून सरकार बनवणाऱ्यांना बाजूला ठेवलं पाहिजे. ही 40 टक्के काय भानगड आहे हे कळेना. कर्नाटकची आजवर इतकी बदनामी कुणीही केली नाही जितकी भाजप सरकारने केली आहे. मिळालेली सत्ता सामान्य माणसासाठी वापरायची असते. पण तसं कर्नाटकात झाल्याचं दिसत नाही.

निवडणुकीत चावी देणारे लोक खूप असतात, पण कुठं थांबायचं हे कळलं नाही की अपघात होतो असा टोला शरद पवारांनी काँग्रेसचे उमेदवार काका पाटील यांना लगावला.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version