मुख्यमंत्री शिंदे कर्नाटक दौऱ्यावर

मुख्यमंत्री शिंदे कर्नाटक दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते कर्नाटकामध्ये भाजपा उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत. तसेच कापू आणि उडुपीमध्ये होणार भाजपाच्या रोडशोमध्ये सुद्धा ते सहभागी होतील. सोमवारी उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिरालाही भेट देऊन संध्याकाळी महाराष्ट्रात परतणार असल्याची माहिती आहे.

भाजप आणि काँग्रेसच्या प्रचारकांकडून याठिकाणी मोठमोठ्या सभा घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बंगळुरमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

कर्नाटक दौऱ्या दरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले,
युतीची प्रचार करायला मी याठिकाणी आलेलो आहे. याठिकाणी मराठी माणसांचे १०३ वर्षे जुने महाराष्ट्र मंडळ आहे. त्यांची मी भेट घेणार आहे. भाजपसाठीच नाही तर देशासाठी ही महत्त्वाची निवडणुक आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आलेली आहे. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकात डबल इंजिन सरकार येणारच. कर्नाटकमधील मतदार भाजपला मतदान करुन बहुमताने निवडून आणतील, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version