कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे हजारो स्थानिकांचे काही दिवसापूर्वी आंदोलन झाले. या परिसरात सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे. येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू ग्रामस्थांची भेट घेतली. बारसू प्रकल्पावरुन रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांच्यात वाद सुरु आहे.
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसू ग्रामस्थांशी संवाद साधताना शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यकर्त्याना या रिफानरीचे समर्थन करून दाखवण्याचे आव्हान दिले. त्याला भाजप नेते, नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. कोकणचा विकास करण्यासाठी कोकणवासीयांना हा प्रकल्प हवा आहे तो रद्द करण्याची हिम्मत कुणाच्यात नाही असा घणाघात राणे यांनी केला. उध्दव ठाकरे कोकणाला लागलेला शाप आहेत अशा शब्दात नितेश राणे यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला.
‘कोणीतरी एक पर्यटक मुंबईवरून आलेला आहे. उद्धव ठाकरे म्हणजे कोकणाला लागलेला शाप आहेत’, अशा शब्दांत नितेश राणेंनी ठाकरेंची खिल्ली उडवली. ते म्हणाले, “बारसू गावामध्ये त्यांचे हेलिकॉप्टर उभे करू दिले नाही. त्यामुळे जैतापूरमध्ये कुठेतरी उभे केले आहे. बारसू गावामध्ये जाऊन काही लोकांशी बोलून पेटवापेटवीचे काम करून ते परत मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. महाराष्ट्राचा सर्वात मोठा दलाल कोण असेल, तर आज तुमच्या रत्नागिरीतील बारसूमध्ये आलेला आहे”, निलेश राणेंनीही जहरी शब्दात ठाकरेंवर टीका केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.