राहुल आईच्या घरात राहायला

राहुल आईच्या घरात राहायला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा नवा पत्ता आता दहा जनपथ असेल. या पाट्यावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी गेली अनेक वर्ष राहत आहेत. राहुल गांधींना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी आपले सामान १० जनपथ येथे हलवले आहे. तसेच राहुल गांधी कामकाजासाठी नवे कार्यालय शोधात आहे.

ओबीसी समुदायाबाबत अश्लाघ्य वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल दोषी ठरले आहेत. मोदी आडनाव प्रकरणात २३ मार्चला सुरतच्या कोर्टानं राहुल गांधी यांना दोषी ठरवलं होते. त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आलं. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी न्यायालयानं राहुल गांधींना ३० दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार, राहुल गांधी याना शिक्षा सुनावल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी राहुल गांधींनी न्यायालयात याचिका दाखल केली. मोदी आडनावावरील वक्तव्यासंदर्भात झालेल्या राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात राहुल गांधींनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु सुरत सत्र न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर बंगला रिकामा करण्याशिवाय तरणोपाय नाही हे राहुल यांना लक्षात आल्यावर शनिवारी त्यांनी घर रिकामे केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version