नागपूरमध्ये महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा पार पडली या सभेसाठी उद्धव ठाकरेंसह, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते, कार्यकर्त्ये नागपूरात उपस्थित होते. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंन बरोबरच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणातून नागपूरच्या जनतेचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बाल्लेकिल्यात झालेल्या वज्रमूठ सभेत महाविकास आघाडील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,
उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सरकारवर बरसण्यात कोणतीच कसर सोडली नाही राज्यात अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असताना मुख्यमंत्री हे देवदर्शनाला गेले. पंचनामा करायला अधिकारी जात नव्हते, असेही उद्धव यांनी म्हटले. शिंदे गटावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे जर रामभक्त असते तर सूरतला, गुवाहाटीला पळाले नसते. हे सगळेजण अयोध्येला गेले असते, असा टोला त्यांनी लगावला.
महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारला अनेक मुद्यावरून चांगलच धारेवर धरलेलं या सभे दरम्यान पाहायला मिळालं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.