ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (१६ एप्रिल) राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. या सोहळ्याप्रसंगी धर्माधिकारी यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘जगातील आठवं आश्चर्य म्हणजे श्री सेवकांची गर्दी’. ‘शरीर स्वछ येतं, पण मन स्वछ कसा करता येणार, पण मन स्वछ केल्याने गरिबीत सुद्धा समाधानानं राहता येत.’ ‘अप्पासाहेबांचे कार्य महान व मोठे आहे.’ ‘हा विलक्षण योगायोग आहे, ‘नानासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अप्पासाहेबांना हा पुरस्कार मिळाला आहे, हा केवळ योगायोग आहे.’
फडणवीस पुढे म्हणाले, आपल्या घराण्याचा चारशे वर्षांचा इतिहास आहे. धर्माधिकारी यांचे वंशंज महाराजांनसोबत होते. धर्मजागरणाचे कार्य आज अप्प्पासाहेब करत आहे. अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, वृक्षारोपन आदी काम यातून धर्माधिकारी आणि श्री सेवकांचे कार्य दिसते. आज मला इथे येण्याचे भाग्य मिळाले या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा कौतुक केलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.