राज्यात अवकाळी संकट कायम

राज्यात अवकाळी संकट कायम

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं असताना आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्याला पुढील ५ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे . पुढील ५ दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १२ ते १४ या कालावधीत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात २८ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला होता. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेचं भर पडली आहे.

कोणत्या भागांत पावसाची शक्यता?

कोकण आणि विदर्भात वातावरण निवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी राज्याच्या इतर भागांमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात आणि संपूर्ण मराठवाड्यात शनिवार १५ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते. मात्र गारपीट होण्याचा धोका कमी आहे, अशीही माहिती माणिकराव खुळे यांच्याकडून देण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version