मुश्रीफांना ३ दिवसांचा अंतरिम दिलासा

मुश्रीफांना ३ दिवसांचा अंतरिम दिलासा

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची मागच्या काही दिवसांपासून ईडीचा रडारवर आहे. अनेकदा ते ईडीचा चौकशीला देखील सामोरे गेले आहेत.
त्यातच आता मुंबई उच्च न्यालयाच्या निर्णयाने हसन मुश्रिफ आणखीनच अडचणीत सापडले आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कागल येथील साखर कारखाण्यात घोटाळा केल्याचा हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप आहे.

हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयाने हसन मुश्रिफांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. कोल्हापुरातील साखर कारखान्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या आरोपांच्या प्रकरण अटकपूर्व जामीन देण्याची विनंती मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळं मुश्रीफ यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु न्यालयामधून हसन मुश्रीफांना ३ दिवसांचा अंतरिम दिलासा देण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत.

मुश्रीफ यांचे जवळचे व्यावसायिक भागीदार आहेत, त्यांचीही चौकशी सुरू आहे. त्यांची कसून चौकशी केली जात असल्याने मुश्रीफ यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या अडीच महिन्यात ‘ईडी’कडून मुश्रीफ यांच्या संपत्तीवर तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. त्यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. मागील सहा ते सात महिन्यांपासून त्यांच्यावर तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version