पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची लूट झाली असून ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. हसन मुश्रीफ, सदानंद कदम यांच्याविरोधातील कारवाईमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता उद्धव गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आणखी एक प्रकरण समोर आणले आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे.
भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. भीमा सहकारी साखर कारखाना हा पुणे जिल्ह्यातील दौंड येथे आहे. राऊत यांनी यासंदर्भात फडणवीस यांना भले मोठे पत्र लिहिले आहे. हा भ्रष्टाचार नेमका कसा झाला, याची संपूर्ण घटना त्यांनी पत्रात लिहिली आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
“पुण्यातील दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात तब्बल ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. कारखान्यात ५०० कोटी रुपयांचे मनी लाॅंडरींग झाले आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार त्यापेक्षाही भयंकर आहे. या भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळत असेल तर मी गंभीर आहे,” असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.
संजय राऊतांनी विधिमंडळाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याकरता विशेषाधिकार समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राहुल कुल आहेत. विशेष म्हणजे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राहुल कुल आहेत. त्यामुळे संजय राऊतांचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.