‘म्हात्रेंच्या व्हिडिओशी मविआचा संबंध नाही’

‘म्हात्रेंच्या व्हिडिओशी मविआचा संबंध नाही’

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील ‘मातोश्री’ नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल झाला आहे. या प्रकरणावर उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. एवढेच नव्हे तर संबंधित व्हिडिओत तथ्य आढळल्यास सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

संजय राऊत म्हणाले कि,”यांनी मला या व्हिडिओबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले. सकाळी असा काही व्हिडिओ आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आली. पण या व्हिडिओशी मविआच्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी, गुन्हे लपवण्यासाठी, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असाल तर ते कायद्याचे राज्य नाही. कोणीही व्हिडिओ काढून व्हायरलं करतं, त्यामुळे याचा आमच्याशी संबंध नाही.”असे संजय राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले की, ” सार्वजनिक कार्यक्रमात कोणीही अशाप्रकारचे अश्लील वर्तन करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत. व्हिडिओ खरा की खोटा याचा तपास करून. तो व्हिडिओ खरा असेल तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करुन समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्याचा तर गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version