हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात हजर राहणार का ?

हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात हजर राहणार का ?

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडीच्या छापेमारीनंतर ३० तासांहून अधिक काळापासून ते नॉट रिचेबल आहेत. मुश्रीफ यांना सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आलं आहे. सोमवारी त्यांना मुंबईमधील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ ईडीसमोर हजर राहणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी शनिवारी ईडीकडून तब्बल साडे नऊ तास छापेमारी करत कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर अवघ्या काही तासांमध्येच ईडीकडून समन्स बजावण्याची कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांना सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीची कारवाई झाली आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, ईडीने सोमवारी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मात्र हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात हजर राहणार की मुदतवाढ मागवून घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण गेल्या ३० तासाहून अधिक काळापासून ते नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या घरावर पडलेल्या धाडीनंतर मुश्रीफ यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version