सरळसेवा पदभरतीसाठी वयोमर्यादेत २ वर्षांची वाढ

सरळसेवा पदभरतीसाठी वयोमर्यादेत २ वर्षांची वाढ

कोरोनाकाळात सरकारी नोकरभरती ठप्प होती. त्यामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा देत सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा वाढवली आहे.

शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत केले आहे.

राज्य सरकारने कमाल वयाची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याचं परिपत्रक जारी केले आहे. यामुळे सरकारी नोकरीसाठीची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढली आहे. कोरोना काळात दोन वर्षे वाया गेल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो बेरोजगारांना दिलासा मिळाला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शासनाने 75 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. हि प्रक्रिया सुरु असताना लोकप्रतिनिधींकडून अनेक निवेदने देण्यात आली आहेत. या निवेदनांचा विचार करून आणि कोरोना विषाणू संकट अशा कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परिक्षेत बसण्याची संधी प्राप्त करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version