पुण्यातील कसबा पेठ पोट निवडणुकीत भाजपची २८ वर्षांची सत्ता उलथवून देत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप यांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. दरम्यान यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. तर यावरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे.
टिळक यांच्या घराण्याला तिकीट नाकारलं. वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. ही सर्वजणांना माहिती आहे, जोपर्यंत त्यांनी शिवसेनेचा वापर केला. अकाली दल, ममतादीदी,जयललीता यांचा वापर करून फेकून दिलं तेच टिळक कुटुंबासोबत केलं आहे’ असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
उद्धव ठाकरे यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, ‘कसबा पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या परिवारातील सदस्याला उमेदवारी नाकारुन भाजपने त्याची वापरा आणि फेका ही वृत्ती पुन्हा एकदा दिसून आली आहे. शिवसेनेलाही त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी वापरले, ममता बॅनर्जी, जयललिता, आकाली दल यांचाही भाजपने त्यांची गरज होती तोपर्यंत वापर केला आहे आणि नंतर फेकून दिले. ही भाजपची वापरा आणि फेकून द्या ही नीती जनतेच्या लक्षात आली आहे. त्याचाच परिणाम कसबा पोटनिवडणुकीत दिसून आला आहे. गिरीश बापट हे आजारी असताना त्यांना प्रचारात उतरवले, मात्र त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्याचे टाळले, हे सर्व जनता पाहात होती. याचाच एकत्रित परिणाम कसबा पोटनिवडणुकीत दिसून आला आहे.’असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.