हे लवकरच पदमुक्त

हे लवकरच पदमुक्त

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिले. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या विधीमंडळातील कार्यालयावरही ताबा घेतला. शिंदे गटाने ठाकरेंना टार्गेट केल्यानंतर आता सन्जय राऊत यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. कारण राऊतांचे शिवसेनेच्या संसदीय मुख्य नेतेपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: तसे संकेत दिले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटारातील आमदारावर अतिशय घालच्या शब्दात टीका केली जात आहे. काळ त्यांनी मुख्यमंत्री शिंदेवर घणाघाती टिकाहीही केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री शिंदेनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात त्यांचे मुख्यनेते पद काढून घेण्याचा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे.

संजय राऊतांचं मुख्य नेतेपद काढून घेतल्यानंतर त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तीकर मुख्य नेते होण्याची शक्यता आहे. विधीमंडळ पक्षानंतर आता संसदीय पक्ष शिंदेंकडे जाणार आहे. राऊतांच्या पदाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सूचक वक्तव्यही केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version