पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकी भोवती अनेक राजकीय नाट्य घडताना दिसून येत आहे. भाजपने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या या प्रस्तावाला महाविकास आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर यांचं नाव जाहीर केले. यानंतर आप, संभाजी ब्रिगेड, ब्राह्मण महासंघ, मराठा सेना इत्यादी पक्ष आणि अपक्ष असे मिळून कसब्यात तब्बल २१ उमेदवारांनी अर्ज दाखल करत शड्डू ठोकला आहे.
भाजपचे हेमंत रासने तर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर काँग्रेसकडून इच्छुक असलेले बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत, अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर टिळक कुटुंबिय व ब्राह्मण समाजाला उमेदवारी न दिल्याने हिंदू महासंघाकडून आनंद दवे यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच बिग बॉस फेम व कवि मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांनी ही अपक्ष अर्ज भरला आहे. यासोबतच इतर छोटे मोठे पक्ष व अपक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीआता २१ उमेदवार रिंगणात आहेत. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यालयात उमेदवाऱ्यांच्या अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. निवडणूक अधिकारी यांनी आज सर्व कागदपत्रे आणि अर्जाची केली छाननी केली आहे. कसबा विधानसभेसाठी एकूण २९ उमेदवारांनी भरले होते, यापैकी आठ उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले.
हेमंत रासने – भाजप,रवींद्र धंगेकर – महाविकास आघाडी,अविनाश मोहिते – संभाजी ब्रिगेड पार्टी
तर अपक्ष उमेदवार: अभिजीत बिचुकले, आनंद दवे कसबा विधानसभेसाठी एकूण २९ उमेदवारांनी भरले होते, यापैकी आठ उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले. यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार हे पाहण्यासाठी आता जनतेत देखील उत्सुकता पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.