‘५० थर नाही ५० खोके लावले’

‘५० थर नाही ५० खोके लावले’

आम्ही पन्नास थरांची दहीहंडी फोडली, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोरा शिवसंवाद यात्रेत प्रत्युत्तर दिले आहे. ५० थर होते की आणखी काही, असा टीका करणारा सवाल त्यांनी आपल्या भाषणात विचारला आहे. दहीहंडी कालच होऊन गेली आहे. कालच महाराष्ट्राच्या तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, त्यांनी पण पन्नास थर लावले होते.

‘पन्नास थर होते की वेगळं काही होतं. त्यांनी सांगितलं त्यांनीही हंडी फोडली. मी आज सांगू इच्छीतो की त्यांच्या सोबत जे जे गद्दार गेलेले आहेत. त्यांना मला विचारायचे आहे, तुम्हाला काय मिळालं? जे गद्दार तिकडे गेले त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मंत्री करू, त्यांनाही वाटलं चांगली खाती मिळतील. त्यांना मिळालं काय? कपील शर्माच्या शोमधली बाबाजी का ठुल्लू?’, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे. उपस्थितांनी दिलेलं प्रेम हे माझ्यासाठी नव्हे तर शिवसेनेसाठी आहे, असेही ते म्हणाले.

‘इथला जनसागर, माणसांचं प्रेम ज्यांनी गद्दारी केलीयं, त्यांनी इथे यावं आणि पहावी,’ असेही ते म्हणाले. ‘गेल्या दोन महिन्यांमध्ये जे काही घाणेरडं राजकारण झालं ते तुम्हाला पटणारं आहे का?, असा सवालही त्यांनी विचारला आहे ?. उद्याचा काळ येणारं भविष्य हे शिवसेनेचेच असेल,ही मला खात्री आहे. आज आमचं स्वागत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही केलं आहे. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात आपण एवढी चांगली कामे केलेली आहेत. ज्यांना आपण प्रेम दिले, आशीवार्द दि. त्यांना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक केली. एवढं सगळं करून त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसला, असेही ठाकरे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version