तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर

तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर

जय महाराष्ट्र न्यूज , मुबई

‘आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं’ हे इतिहासातील अत्यंत प्रचलित झालेले तानाजी मालुसरेंचे वाक्य प्रत्येकाचे जणू तोंडपाठ झाले आहे.

तानाजी मालुसरेंच्या शौर्यकथा इतिहासात प्रचंड गाजल्या आहेत. आणि आता प्रेक्षकांसाठी प्रत्यक्ष तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

 

अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात मालुसरेंची जीवनकथा, त्यांचा शिवाजी महाराजांवरील जिव्हाळा आणि स्वराज्याबद्दलची

आपुलकी याचे एकंदरीत चित्रण या सिनेमात दिसणार आहे.

 

तानाजी : ‘द अनसंग वॉरियर ‘ असे या सिनेमाचे पोस्टर अजयने ट्विटरवर शेअर केले आहे. दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून 2019 मध्ये हा

सिनेमा रिलीज होणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version