जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईचे प्रथम नागरीक अर्थात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जय महाराष्ट्रच्या न्यूजरूममध्ये दिलखुलास मुलाखत दिली.
यावेळी महाडेश्वर यांनी अनेक प्रश्नांची थेट अचूक बिनधास्त उत्तरे दिली
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे
– सूचना आल्यास बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तात्काळ महापौर बंगल्याची जागा रिकामी करुन देणार
– लाल दिवा नाही तर जनतेची कामं माझ्यासाठी महत्वाची
– लाल दिवा काढण्यासंदर्भातील नियम अथवा सूचना आली असेल त्याचे पालन करणारच
– मुंबई महापालिकेचा कारभार अतिशय स्वच्छ आहे
– फक्त निवडणुकीपुरती नाही तर 365 दिवस शिवसेनेची कार्यालये जनतेच्या सेवेसाठी उघडी असतात.
– मुंबईच्या विकासासाठी पक्षीय राजकारण नको
– 62 कोटी रुपयांच्या ठेवी या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी तसेच कल्याणकारी योजनांसाठी ठेवण्यात आला आहे
– मुंबई महापालिका सरप्लसमध्ये असेल तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबत विचार करु
– फक्त टिळा लावणारे आणि छाती उघडी ठेवणारे शिवसैनिक नाहीत
– निरपेक्ष भावनेने पक्षाची सेवा केली
– यंदा मुंबईकरांना खड्डेमुक्त प्रवास करता यावासाठी प्रयत्नशील
– यंदा इस्राईल देशातील तंत्रज्ञान वापरुन मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करणार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.