जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वेगवेगळी आंदोलनं केली जात आहे.
सांगलीत कडकलक्ष्मी आंदोलन करण्यात आले. मानवधिकार संघटनेचे विजय जाधव हे पोतराजाच्या वेशात मी शेतकरी बोलतोय हे आंदोलन घेऊन मुंबईला निघालेत.
मी शेतकरी बोलतोय हे अभियान घेऊन पोतराजाच्या भूमिकेतून ते मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कर्जमाफीची मागणी करणारे निवेदन देणार
आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.