शेतकऱ्यांना सरकारने दिलेली कर्जमाफी पुरेशी नाही – शरद पवार

शेतकऱ्यांना सरकारने दिलेली कर्जमाफी पुरेशी नाही – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली सरसकट कर्जमाफी पुरेशी नाही. मात्र सरकानं शेतकऱ्यांसाठी उचललेलं कर्जमाफीचं पाऊल स्वागतार्ह असल्याचं मत राष्ट्रवादीचे

सर्वेसर्वा शरद पवारांनी व्यक्त केले.

 

त्यामुळे सरकारशी समन्वयाची भूमिका राष्ट्रवादीची राहील. अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. तसेच शेतकरी थकबाकीदार का बनतो याचे मूळ कारण शोधणं गरजेचं

असल्याचं देखील ते म्हणाले.

 

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर, काश्मीरमध्ये वाढत असलेल्या दहशतवादी

कारवायांबाबतही शरद पवारांनी चिंता व्यक्त केली.

 

देशात अंतर्गत सुरक्षा वाढवली पाहिजे आणि दहशतवादाविरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र आले पाहिजे अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. त्याबाबत केंद्र सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत. पाकिस्तानसोबत युद्ध करावे अशी माझी भूमिका नाही, मात्र वाढत्या दहशतवादावर अंकुश लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही पवार यांनी स्पष्ट केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version