येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

मध्य पूर्व बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ‘मोरा’ चक्रीवादळात झाले आहे. येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

 

नैऋत्य मोसमी पावसाने सोमवारी दक्षिण अरबी समुद्र, मालदिव, कोमोरिन परिसर, तसेच बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम आणि पूर्वमध्य परिसरात प्रवेश केला. मान्सूनची ही वाटचाल पाहता आज तो केरळमध्ये दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

केरळबरोबरच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, तमिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, उत्तरपूर्व भारताच्या काही भागात येत्या 24 तासांत प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल स्थिती आहे.

 

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला असून, येत्या 24 तासांत दक्षिण कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version