२४ वर्षीय डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

२४ वर्षीय डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन केली  आत्महत्या

जालना येथील भोकरदन या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या केली आहे . प्रांजल ज्ञानेश्वर कोल्हे यांनी रविवार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. तसेच प्रांजलचे पाच महिन्यांपूर्वीच शहरातील जनाई हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर कोल्हे यांच्याशी विवाह झाला होता. डॉक्टर असलेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. माझ्या मृत्यूला कोणालाच दोषी धरू नका, असे भावनात्मक पत्र वडिलांच्या नावे लिहून डॉ. प्रांजल ज्ञानेश्वर कोल्हे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. भोकरदन येथील शिवाजी नगर परिसरातील लोइन्कम सोसायटीमध्ये डॉ. प्रांजल या भाड्याने राहत होत्या. डॉ.प्रांजल यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र त्यांनी वडिलांच्या नावे लिहिलेली चिठ्ठी पोलीसांना मिळाली आहे. हे पत्र अतिशय भावनिक असून डॉ. प्रांजल यांनी वडिलांना उद्देशून लिहिले आहे, ‘पप्पा मला माफ करा, मी आज आत्महत्या करीत आहे. त्यामध्ये कोणाला दोषी धरू नये.’ घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे, पोलीस निरीक्षक शालिनी नाईक, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पवार आदींनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच शहरातील ग्रामीण रुग्णालयात दुपारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर रविवारी सायंकाळी सात वाजता तालुक्यातील बरंजळा साबळे या त्यांच्या गावी डॉ प्रांजल यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version