धावत्या लोकलच्या दरावाजात उभ राहून तुम्ही फोनवर बोलत असाल तर ही बातमी वाचून तु्म्हाला जबर धक्का बसेल

धावत्या लोकलच्या दरावाजात उभ राहून तुम्ही फोनवर बोलत असाल तर ही बातमी वाचून तु्म्हाला जबर धक्का बसेल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

23 वर्षीय तरुणीला मोबाईल चोरामुळे आपला एक पाय आणि हाताची काही बोटे गमवावी लागली. ही घटना मुंबईच्या सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे.  याप्रकरणी चोराला अटकही करण्यात आली असून चोरी करणारा मुलगा हा अल्पवयीन असल्याच समोर आलं आहे.

कल्याणमध्ये राहणारी द्रविता सिंग ही 23 वर्ष तरुणी बुधवारी सकाळी लोकलने सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. त्यावेळी तिला फोन आला, मोबाईलवर बोलण्यासाठी ती लोकलच्या दरवाजावर गेली. ती फोनवर बोलत असतानाच अचानक तिच्या डोक्यावर बांबूचा जोरदार फटका बसला. त्यामुळे द्रविता थेट लोकलमधून खाली पडली.

ती ट्रॅकमध्ये पडताच आरोपीनं तिचा मोबाईल हिसकावून पळ चेराने तिथून पळ काढला. द्रविता ट्रॅकवर पडली व लगेच तिला येणाऱ्या दुसऱ्या लोकलनं धडक दिली. या अपघातात तिला आपला एक पाय आणि हाताची काही बोटं गमवावी लागली. या संपूर्ण प्रकरणाचा द्रविताला प्रचंड धक्का बसला असून ती अद्यापही त्यातून सावरलेली नाही.

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ पावल उचलत या मोबाईल चोराला अटक केली. त्याने द्रविताचा फोन चोरुन तो जवळच्याच झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेला विकला होता. पोलिसांनी त्या महिलेला देखील अटक केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version