भाजपा-शिवसेनेचं ठरलं ?

भाजपा-शिवसेनेचं ठरलं ?

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला 48 जागा देणार असल्याचे विधान केले. मात्र, बावनकुळेंच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटणार त्यामुळे प्रसारमाध्यमांवर बावनकुळेंचं विधान व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओ हटवण्यात आला.

आगामी निवडणुकीत शिवसेनेला 48 जागा मिळणार असल्याचे बावनकुळेंचं वक्तव्य प्रसार माध्यमांवर व्हायरल होताच व्हिडिओ हटवण्यात आला आणि भाजपाकडून सारवासारव करण्यात आली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले तर शिवसेनेच्या जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी दिले आहे.

मुंबईमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांची बैठक पार पडली. याबैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 48 जागा देणार असल्याचे वक्तव्य केलं. तसेच भाजपा 240 जागा लढवणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र, बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता असल्यामुळे प्रसारमाध्यमांवरील बावनकुळेंचा व्हिडिओ हटवण्यात आला.

बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुकीबाबत भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाचा निर्णय संबंधित पक्षाच्या क्षमतेवर घेण्यात येणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version