राज्यात शेतकरी संपावर असताना 2 शेतकऱ्यांची आत्महत्या

राज्यात शेतकरी संपावर असताना 2 शेतकऱ्यांची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

 

एकीकडे कर्जमाफासाठी शेतकरी संपाचा मुद्दा पेटलेला असातानाच दुसरीकडे दोन शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खोलमारा येथे ईश्वर मदनकर या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

 

त्यांच्यावर ग्रामीण बॅंकेचं 65 हजार रुपयांच्या कर्जासह खाजगीही कर्जही होतं. त्याच्या खिशात देणेकऱ्याची नाव असलेली चिठ्ठीही सापडली.

 

 

तर, नाशिकमधील येवला तालुक्यातील पिंपरी मधील नवनाथ भालेराव यांनी कर्जाला कंटाळून विष पिउन आत्महत्या केली. महत्वाचं म्हणजे नवनाथ भालेराव यांनी शेतकरी संपात सक्रीय सहभाग घेतला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version