‘ते’ धक्कादायक इंजेक्शन आणि पृथ्वीराज चव्हाण

‘ते’ धक्कादायक इंजेक्शन आणि पृथ्वीराज चव्हाण

सोलापुरातील मार्कंडेय सहकारी सोलापूर रुग्णालयात ॲडमिट असलेल्या 2 वर्षांच्या बाळाला देण्यात आलेल्या इंजेक्शनच्या बॉटल मध्ये अळ्या निघाल्या आहेत. त्यामुळे बाळाच्या वडिलांनी ती बॉटल घेउन थेट जेलरोड पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. पृथ्वीराज चव्हाण असं या 2 वर्षीय रुग्णाचे नाव असून त्याचे वडील दत्ता चव्हाण यांनी पोलिसात तक्रार केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण याला ताप येत असल्याने 31 सप्टेंबरला मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  नर्सने लिहून दिलेली औषधं त्याच्या वडिलांनी रुग्णालयाच्याच औषध भांडारातून खरेदी करुन आणून दिली. त्यातील एक औषध सलाईनच्या बाटलीत मिक्स करून पेशंटला देण्यात येतं. त्या बाटलीतील काही औषध पेशंटला देण्यात आली. उर्वरीत औषध सायंकाळी देण्यात येणार होती.

दरम्यान रुग्णाचे काका रुग्णाला भेटण्यासाठी आले असताना त्यांना औषधाच्या बाटलीत अळी आणि घाण असल्याचं आढळलं. त्यांनी ताताडीने रुग्णालय प्रशासनाला संपर्क साधला. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे रुग्णाच्या वडिलांनी ती बाटली घेऊन जेलरोड पोलिसात रुग्णालयाच्या विरोधात तक्रार केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version