नागपुरात वर्षाचा शेवटही दोन हत्यांनी

नागपुरात वर्षाचा शेवटही दोन हत्यांनी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

वर्षाच्या शेवटी आणखी दोन हत्येच्या घटनेने नागपूर शहर हादरले. पहिली हत्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशीर्वाद नगर मध्ये झाली.अबीर रावंजी दुराई हे मृताच आहे. तर दुसरी हत्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुयोग नगर येथे झाली. मृताच नाव प्रेमलाल देसाई आहे. या दोघांची धारदार शास्त्राने हत्या केली गेली व मृतदेह रस्त्यावर फेकून दिला गेला.या दोन हत्येच्या घटनेने नागपूरच्या हत्या सत्राचा शेवट झाला असून गेल्या वर्षात हत्येचा आकडा ९१ वर पोहचला आहे. अबीर दुराई हा इडली संभारवडा ची गाडी चालवायचा .

व्यवसायिक वादातून त्याची हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. रात्री दुकान बंद केल्या नंतर दुराई हे मित्रा सोबत बाहेर गेले नंतर घरी परतलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा स्थानिकांना रस्त्यावर त्याचा मृतदेह दिसला तेव्हा त्यांनी पोलिसांना कळविले. हुडकेश्वर पोलीसांकडून या दोन्ही हत्येतील आरोपींचा शोध सुरु आहे. या संपूर्ण वर्षात नागपूर शहर अनेक हत्यासत्रांनी हादरून गेले होते व वर्षाचा शेवट देखील दोन हत्येच्या घटनेने झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version